Type Here to Get Search Results !

प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा : पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे


पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण

 सोलापूर : शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आहे.  या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा, अशी अपेक्षा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  डॉ. नवनाथ नरळे यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागांतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर,सोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची  तुकडी क्रमांक ०१ चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर  डॉ. नवनाथ नरळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना डॉ. नरळे बोलत होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यशोगाथा सधन कुक्कुट विकास गटचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी विषद केले. या उद्योगाबाबत बँकेच्या अडचणी उद्भवल्यास  संबधित गट विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी (बि) यांच्याशी संपर्क साधावा, असेही डॉ. नरळे यांनी यावेळी म्हटले . 

ही प्रशिक्षणाची तुकडी १० ते २४ जून २०२४ या कालावधीत संपन्न झालेली असून, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतले. तसेच पुढील प्रशिक्षण तुकडीस जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पशुपालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी केले आहे.