Type Here to Get Search Results !

'राईट टू गिव्ह अप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अंतिम संधी



सोलापूर : जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील  विद्यार्थ्याचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर  शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता शिष्यृत्ती व विद्यावेतन या योजनेचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने ‘राईट टू गिव्ह अप’ हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील, केवळ अशा विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे दि. 30 जून 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलीय.

विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर मनिषा फुले यांनी केलं आहे.