सोलापूर : फिरदोस महिला शिक्षण व समाजसेवा संस्था, संचलित चाँद-तारा उर्दू प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्षा डॉ. जे. बी. बागवान उपस्थित होते. संस्थेची व शाळेची माहिती मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी दिली. नवीन प्रवेश विद्यार्थ्यांचे स्वागत बागबान नाहिद सुल्ताना व चौधरी यास्मीन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजावर आफ्रीन यांनी केले तर शेख शमीम यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.