सोलापूर : ४० वर्षीय मावशीसह अल्पवयीन भाची बेपत्ता झालीय. ही घटना नई जिंदगी परिसरातील विजयालक्ष्मी नगरात बुधवारी, २२ मे २०२४ रोजी घडलीय. उभयतांचा सर्व नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता, ते न मिळून आल्याने दाखल अर्जानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद घेण्यात आलीय.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रेहाना नजीर उस्ताद (वय-४५ वर्ष) हिची बहिण फरजाना इक्बाल मलिक (वय-४० वर्ष) ही पुणे येथील कोंढवा परिसरातील मिठ्ठा नगरात वास्तव्यास असते. ती मे महिन्यात सोलापूरला बहिणीच्या घरी आली होती.
फरजाना मलिक व तिची अल्पवयीन भाची इरम नजीर उस्ताद या दोघी, २२ मे रोजी राहत्या घरातून कोणास काही न सांगता घराबाहेर पडल्या. त्या घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता, त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर रेहाना नजीर उस्ताद हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला. त्यानुसार १९ जून रोजी बेपत्ता नोंदवहीत नोंद घेण्यात आलीय.
फरजाना इक्बाल मलिक हिची अंदाजे उंची १६० सेमी, रंग-सावळा, भाषा-हिंदी,पोषाख-हिरवा पंजाबी ड्रेस असं तर इरमची उंची - १५९ सेमी, रंग - गोरा, भाषा - हिंदी आणि पोषाख - शेवाळी कलरचा बुरखा असं वर्णन आहे. यासंबंधी माहिती मिळाल्यास पोलीस हवालदार एस. के. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.