Type Here to Get Search Results !

टेंभूर्णी-अकलूज येथील वाहतूक मार्गात बदल : पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे


सोलापूर :  संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर ते तोंडले या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. पालखी सोहळ्यापूर्वी नवजीवन हॉस्पीटल अकलाई कॉर्नरजवळ जंक्शन करण्याचे काम सुरू आहे. हे काम पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सूचना दिल्या असून, सदर काम करताना टेंभूर्णी ते अकलूज व अकलुज ते टेंभूर्णी या रहदारीमुळे अडथळा होत असल्याने  25 जून रोजीचे 04 वाजेपासून ते 26 जून रोजीचे 08.00 वाजेपर्यंत टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूर्णी येथील  वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये प्राप्त शक्तीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. दिनांक 25 जून रोजी 04.00  ते 26 जून रोजी 08.00 वाजेपर्यंत अकलूज ते टेंभूर्णी व टेंभूर्णी ते अकलूज या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बाह्य वळणाने वळविणेकरीता पर्यायी मार्गाचा वापर करतील.

अकलूजमधील कर्मवीर चौक (मसुद मळा) या बाह्यवळण ठिकाणाहून अकलूजकडून टेंभूर्णीकडे जाणारी वाहने अकलुज महाळुंग 25/04, लवंगमार्गे टेंभूर्णीकडे जातील, तर माळीनगरकडे जाणारी स्थानिक वाहने महाळुंग रस्ता, पांढरे वस्ती मार्गे माळीनगरकडे जातील. तर 25/4 चौक, लवंग (महाळुंगकडे जाणारा चौक) बाह्यवळण ठिकाणाहून  टेभुर्णीहून अकलूजकडे येणारी वाहने 25/4 चौक, लवंग, बाबरी पूलमार्गे अकलुज शहरात येतील. तसेच माळीनगर ते अकलुज व अकलुज ते माळीनगर अशी स्थानिक वाहतूक माळीनगर, पांढरे वस्ती मार्गे अकलुजकडे येतील व अकलूजकडून माळीनगरकडे जातील.

या आदेशाचा अंमल हा दि. 25 जून 2024 सायं.04.00 वा.पासून ते दि.26 जून 2024 रात्री 08.00 वाजे.पर्यंत लागू राहिल. असेही आदेशात नमूद केले आहे.