सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर व दिव्यांगा करिता नॅशनल करिअर सर्विस सेंटर, भारत सरकार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे दि. 26 व 27 जून 2024 रोजी दिव्यांग उमेदवारासाठी व्यवसायाची माहिती व मुल्यांकन करण्याबाबत शिबीर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहा.आयुक्त ह. श्री. नलावडे यांनी कळविले आहे.
या शिबीरामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे अपंगाचे मूल्याकंन व नोंदणी करुन दिव्यांगांना उपलब्ध विविध संधी, रोजगार व स्वयंरोजगार व प्रशिक्षण आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीरासाठी अस्थि विकलांग दिव्यांग यांनी, 26 जून 2024 रोजी तर अंध मुकबधीर, व इतर दिव्यांग यांनी दि. 27 जून 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत उपस्थित रहावे.
उमेदवारांनी येताना त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र (मुळ व सत्यप्रतीसह) व पासपोर्ट आकाराच्या दोन फोटोसह उमेदवारांनी उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी 0217- 2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहा.आयुक्त ह. श्री. नलावडे यांनी केले आहे.