सागर सिमेंटच्या दोन लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी ऐन वेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करुन मला साथ दिली आहे. भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन. ते एक दानशूर व्यक्ती म्हणून सर्वपरिचित आहेत. गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल, असं प्रतिपादन नुतन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
सागर सिमेंट व एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिध्देश्वर साखर कारखाना, सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शिवपुत्र महास्वामी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काडादी, दत्तात्रय मुळे, सागर सिमेंट चे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सिध्दाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच एम के फाउंडेशन व सागर सिमेंट चे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे. या संधीचे सोनं करण्याचे काम मी नक्कीच करेन, यासाठी तुमची सदैव साथ माझ्या पाठीशी असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की, महादेव कोगनुरे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचे पवित्र कार्य करताना दिसतात. हे कार्य नक्कीच समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना महांतेश स्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महादेव कोगनुरे हे अहोरात्र झटत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले की, सामाजिक कार्य करत असताना आज ही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते, याकडे मी दुर्लक्ष करीत मी माझ्या सामाजिक ऋण फोडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले. यावेळी सिध्दाराम चाकोते, अशोक देवकते आदींनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर शिवाजी राठोड-पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
...चौकट
वंचितांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे प्रयत्न : धर्मराज काडादी
लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे महादेव कोगनुरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहे, असं धर्मराज काडादी यांनी यावेळी म्हटले.
....फोटो ओळ :
सागर सिमेंट व एम के फाउंडेशन च्या वतीने दोन लाख वह्या व सायकल वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करताना खासदर प्रणिती शिंदे, शिवपुत्र महास्वामीजी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काडादी, महादेव कोगनुरे, दत्तात्रय मुळे, आनंद लोणावत आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.