मु. पैलवान यांच्या सामाजिक कार्याचं आजच्या युवकांनी करावं अनुकरण : आमदार विजय देशमुख

shivrajya patra

सोलापूर : येथील पत्रा तालिमचे संस्थापक मुरलीधर बहादुरजी घाडगे उर्फ मु पैलवान यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी, ०२ जून रोजी पत्रा तालीम येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीरात युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


प्रारंभी मु पैलवान यांच्या प्रतिमेस आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. आमदार देशमुख यांनी यावेळी बोलताना, मु पैलवान यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत आजच्या युवकांनी त्याचं अनुकरण करावं, असं आवाहन केलं.



त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या रक्तदान शिबीरात युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.



यावेळी आमदार विजय देशमुख, पत्रा तालीमचे खलिफा दत्तात्रय कोलारकर, पद्माकर काळे, राजू जोशी, शिवाजी चव्हाण, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, गणेश शेळके, दत्ता बनसोडे, लहू गायकवाड, सचिन शिंदे, पिंटू इरकशेट्टी, आनंद कोलारकर, व्यंकटेश पवार, तम्मा गुडुर, सुहास कोलारकर, सचिन स्वामी, अमृत भुरळे, गणेश भुरळे, सुरज भोसले, निलेश शिंदे, शेखर सातपुते, ओम घाडगे, आदित्य घाडगे, मयुरेश घाडगे, आदींसह पत्रा तालीम युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top