मसाल्याने भरलेला आयशर लुटून चोरट्यांचा 'सुहाना' सफर; ३६ लाखाहून अधिक किंमतीच्या ऐवजाची लूट

shivrajya patra

मोहोळ/यासीन अत्तार : अनोळखी सहा लोकांनी चालकास शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने दहशत माजवून त्याच्या ताब्यातील सुहाना मसाला बॉक्सने भरलेला आयशर ट्रक जबरदस्तीने मालासह नेलाय. या दरोड्यात आयशरसह ३६ लाख रुपयांचा माल लुटून नेण्यात आलाय. हा प्रकार मोहोळपासून ४-५ किलोमिटर अंतरावर शनिवारी रात्री पाऊणे अकरा वा. च्या सुमारास घडलाय. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सागर भोजु पवार (रा.गावडी दारफळ) याच्यासह ०६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, MH 45/AF 8424 क्रमांकाचा आयशर चालक पुण्याहून १६, ३८, ५९८ रूपये किंमतीचे सुहाना मसालाचे बॉक्स व पाकीटे त्या वाहनात भरून सोलापूरकडे येत होता. ते मोहोळपासून ४-५ कि मी अंतरावरील मेवाती धाब्याच्या अलिकडे थोड्या अंतरावर नैसर्गिक विधीच्या निमित्ताने थांबला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या ६ जणांनी सुहाना मसाला ने भरलेला आयशर व अन्य ऐवज असा एकूण १६, ३८, ५९८ रूपयांचा मुद्देमाल घेऊन काळसर रंगाचे स्विफ्टसारख्या दिसणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये बसून निघून गेले.

या लुटीत १) १६, ३८, ५९८ रूपये किमतीचे सुहाना मसालाचे बॉक्स व पाकीटे, २) २०, ००, ००० रूपये किमतीचा चारचाकी आयशर टेम्पो तिचा नोंदणी क्र.MH 45 /AF 8424, ३) ३०, ००० रूपये किंमतीचा vivo कंपनीचा V27 मॉडेलचा मोबाईल फोन, ४) ००/०० किमतीचे आयशर व युनिकॉर्न मोटारसायकल गाडीचे आरसी बुक, गाडी मालकाचे गाडीत असलेले लायसन, 02 ATM कार्ड, त्यापैकी एक अॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक असा ऐवज क्लिनरला मारहाण करुन लुटून नेला.

याप्रकरणी आयशरचा क्लीनर रोहीत उर्फ कुणाल बाळासाहेब गडहिरे (वय-२० वर्षे, रा. वाणी चिंचाळे, ता. सांगोला) यांनी दाखल केलेले फिर्यादीनुसार रविवारी १२.२१ वा. मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सागर भोजु पवार (रा.गावडी दारफळ), शिवा रामा काळे (रा. होटगी, सोलापुर), अमोल व स्वामी (पुर्ण नावे माहिती नाहीत) यासह दोन अनोळखी चोरट्यांनी ही लुट करणाऱ्यांचा आरोपीतांमध्ये समावेश आहे.

क्लिनरला मारहाण करणाऱ्या व लुटणाऱ्या चोरट्याला तसेच त्याचेबरोबरील इतर अनोळखी चोरट्यांना मी पुन्हा पाहिल्यास त्यांना मी ओळखेन, असंही रोहित गडहिरे यांने म्हटलंय. सोलापूर-पुणे महामार्ग असुरक्षित महामार्ग म्हणून नवीन ओळख धारण करते की काय अशी भीती वाहन चालकांमधून व्यक्त केली जातेय. पोलीस निरीक्षक राऊत या गुन्ह्याचा आधी तपास करीत आहेत.

To Top