Type Here to Get Search Results !

मोटार सायकल चोरीचे ०५ गुन्हे उघड; शहर गुन्हे शाखेच्या कामगिरीत १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत


सोलापूर : पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दादासो मोरे व त्यांच्या तपास पथकाने, त्यांना मिळालेली बातमी व तांत्रिक विश्लेषणाचे अनुषंगाने जून २०२४ मध्ये वेगवेगळ्या ०५ आरोपींकडून सोलापुर शहरातील विविध पोलीस ठाण्यास दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणले. या ०५  मोटरसायकलींची किंमत १, ६०, ००० रुपये असल्याचे माहिती कक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय. 

सदर बझार पोलीस ठाणे गुरनं. ४३१/२०२४ या गुन्ह्यातील, एम.एच.१३ सी.डी. ८९३४ या क्रमांकाची २५,००० रुपये किंमतीची हिरो होंडा शाईन ही मोटारसायकल रावजी विरप्पा माने (वय ४६ वर्षे, रा. रेलगंठी कॉम्प्लेक्स, अशोक चौक, सोलापूर) याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे.

विजापुर नाका पोलीस ठाणे गुरनं. २१८/२०२४ या गुन्ह्यातील एम.एच.१३ बी.जे. ०१८५ या क्रमांकाची २०,००० रुपये किंमतीची हिरो एच.एफ. डिलक्स ही मोटारसायकल सुर्यकांत अप्पाराव हेलगर (वय ३९ वर्षे, रा. २१२, भवानी पेठ, सोलापूर) याच्याकडुन २४ जून रोजी हस्तगत करण्यात आलीय.

विजापूर नाका गरीबी हटाव झोपडपटटी नं. १ येथील रहिवासी मलीक हुसेन पटेल (वय २७ वर्षे) याच्याकडून २५ जून रोजी, सदर बझार पोलीस ठाणे गुरनं.- २७२/२०२४ या गुन्ह्यातील एम.एच.१३ सी.पी. ०८३० या क्रमांकाची सुमारे ३५,००० रुपये किंमतीची, बजाज सीटी १०० ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. 

जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुरनं.- ३४९/२०२४  गुन्ह्यातील के. ए. ०१ जे.एक्स. ४७५२ या क्रमांकाची आणि ४०,००० रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल सुनील भिम शेरखाने (वय २६ वर्षे, रा. प्लॉट नं. १२३, शिवगंगा नगर, नई जिंदगी, सोलापूर) याच्याकडून गुरुवारी, २७ जून रोजी हस्तगत करण्यात आलीय.

जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील  गुरनं. १३०/२०२४ गुन्ह्यातील एम.एच. १३ डी. व्ही. १३७८ या क्रमांकाच्या ४०,००० रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल शुक्रवारी, २८ जून रोजी युसुफ बाशुमियाँ शेख (वय ५३ वर्षे, रा. घर नं. ६४६, उत्तर सदर बझार, सोलापूर) याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलीय.

ही कामगीरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासाो मोरे, पोलीस अंमलदार- संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, राजकुमार पवार, दिलीप किर्दक, पोह-पाटील, पोशि-राठोड, प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.