कासेगाव : हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगे (तळे) येथील लिपिक प्रदीप उद्धव भुसारे हे नियत वयोमानानुसार, ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा सत्कार व अभिष्टचिंतन कार्यक्रम शनिवारी २९ जून रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती पुष्पा लोंढे या होत्या. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रदीप भुसारे यांनी केलेल्या कार्याची माहिती तसेच त्यांच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी, भुसारे यांच्या सेवावृत्तीचे कौतुक करताना, उर्वरित आयुष्य निरोगी, आनंदी, उत्साही वातावरणात जावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. मनमिळावू वृत्तीचे सर्वपरिचित प्रदीप भुसारे यांचा सपत्नीक सत्कार प्रशालेच्या वतीने तसेच इतर नातेवाईक यांच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड, संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन लोंढे, संस्था सदस्य सहदेव ढवळे, विपुल गंभीरे, मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत तसेच प्रदीप भुसारे यांचे सर्व नातेवाईक, मित्र व प्रशालेतील शिक्षक-विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.