Type Here to Get Search Results !

जी. डी. सी. ॲण्ड ए व सी. एच. एम परीक्षेचा निकाल जाहिर; गुणपत्रक व प्रमाणपत्र प्राप्त करण्याचं आवाहन


सोलापूर : सहकार विभागामार्फत जी. डी. सी. अॅन्ड ए व सी. एच. एम. परीक्षा मे 2023 मध्ये घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. सदर परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचेकडून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर या कार्यालयास प्राप्त झालेले असून, संबंधीत परीक्षार्थीनी  प्रमाणपत्र व गुणपत्रक घेवून जावे असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक अधिकारी, सहकारी संस्था, किरण गायकवाड यांनी केलं आहे.

विद्यार्थ्यांनी  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 'ई-ब्लॉक', पहिला मजला, जूने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन, प्रवेशपत्र अथवा ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र इ.) दाखवून प्रमाणपत्र व गुणपत्रक प्राप्त करुन घ्यावे, असं आवाहनही जिल्हा उपनिबंधक अधिकारी, सहकारी संस्था, किरण गायकवाड यांनी केलं आहे.