सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाला गुरूवारी, 27 जून 2024 रोजी विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केट यार्ड चौकामध्ये अशोक लेलंड वाहन क्र. KA-14, C- 7515, KA-14, C-0850 व KA-14, C-4619 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रीत व किटकबाधीत सुपारीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले.
या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी या अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित 73 हजार 495 किलो किंमत 76 लाख 43 हजार 37 रुपयाचा साठा कमी दर्जाच्या संशयावरुन जप्त करुन ताब्यात घेतला असून, सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरु आहे.
ही कारवाई विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त साहेब देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे, उमेश भुसे व श्रीमती रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली.