Type Here to Get Search Results !

पत्रकार मारहाण प्रकरणातील हल्लेखोर व त्यामागील 'मास्टरमाईंड' वर व्हावी कठोर कारवाई; डिजिटल मीडियाची मागणी


सोलापूर : सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉ. राखी माने यांची प्रतिनियुक्ती नगरविकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली असल्याची गंभीर बाब या मालिकेतून प्रकाशझोतात आल्यावर एमडी न्यूजचे संपादक व डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैपन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला. या घटनेतील हल्लेखोर व हल्ल्यामागील 'मास्टरमाईंड' वर कठोर कारवाई करण्याची मागणी सोलापूर डिजिटल मीडिया च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केलीय.

डिजिटल न्यूज वेब पोर्टल एमडी न्यूज-२४ मध्ये गेल्या महिनाभरापासून 'पंचनामा'  या मथळ्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणला आहे. त्यातच शहर आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती किंवा प्रति नियुक्ती करताना, राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला वैद्यकीय क्षेत्रातील MBBS-DPH, MBBS-PSM असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आवश्यकता असते. तरी देखील ही नियमावली डावलून नगरविकास मंत्रालयाने राखी माने (MBBS- ENT) डॉक्टरांची प्रतिनियुक्ती केली. 

ही प्रतिनियुक्ती नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, हा गंभीर प्रकार एमडी न्यूज मार्फत सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. सोलापूर करांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बातम्या प्रसारित करताना डॉ. राखी माने यांचा तात्विक विरोध होता, त्यातच पत्रकारावर खऱ्या-खुऱ्या बातम्या प्रकाशित केल्या, म्हणून होणारे हल्ले चिंताजनक असल्याचे असा सोलापूर डिजिटल मीडिया निवेदनात उल्लेख आहे. 



सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सैपन शेख यांना वेळोवेळी फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला. गुंडामार्फत धमकावण्याचाही प्रयत्न केला. सोलापूर महानगरपालिकेत घुटमळत राहणारा गुंड प्रवृत्तीचा श्रीकांत गायकवाड यांच्यामार्फत देखील आठ दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती.

गुरुवारी, २७ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शहर आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी कट रचून एका हस्तकांमार्फत पत्रकार सैपन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले, आणि बातम्या बंद करण्यास सांगितले. काही वेळाने डॉ. राखी माने (शहर आरोग्य अधिकारी) यांनी श्रीकांत गायकवाड याला पाठवून दिले आणि शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितलं असल्याचा आरोप डिजिटल पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात केलाय.

श्रीकांत गायकवाड हा मारहाण करताना, आणि प्रसिद्धी माध्यमातून डॉ. राखी माने ही माझी मावस बहीण आहे असे सांगत होता. यावरून हे सिद्ध होते की, खऱ्या आणि योग्य बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार सैपन शेख यांना मारहाण करण्यात आली. खरी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची हस्ते-परहस्ते शहरातील अधिकाऱ्यांमार्फत मुस्कटदाबी केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येतंय.

सोलापूर स्थानिक प्रशासनाने शहर आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने व पत्रकार सैपन शेख यांना मारहाण केलेले डॉ. माने यांचे मुहबोले मावस भाऊ श्रीकांत गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी डिजिटल पत्रकार संघाची मागणी आहे. कारवाई नाही झाली तर सोलापुरातील सर्व डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलाय.

यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष जमीर शेख, यशवंत पवार, इरफान शेख, उजेब इनामदार, शहानवाज शेख, आकीब मडकी, सादिक शेख, अल्ताफ शेख, अजमेर शेख, मोसिन बागवान, अर्जुन चौहान,  समीर आबदीराजे, अशफाक शेख, बाबा शेख, प्रदीप चौहान आदि पत्रकार उपस्थित होते.