Type Here to Get Search Results !

सोलापूर शहर बागबान जमियतच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन


सोलापूर : बागबान समाजातील जे विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१०वी), उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) व पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सोलापूर शहर बागबान जमियततर्फे शनिवारी, ०६ जुलै रोजी दुपारी ४.०० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले हॉल (श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ) येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. 

यंदा संपलेल्या शैक्षणिक वर्षात (२०२३-२४) बागबान समाजातील जे विद्यार्थी-विद्यार्थिनी १०वी, १२वी व पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपीवर मोबाइल क्रमांक लिहून बागबान जमियतच्या ऑफिसमध्ये जोडभावी पेठ, जिनतुल मस्जिद जवळ येथे सायंकाळी ५.०० ते ८.०० वा. पर्यंत आणून द्यावे, अथवा ओवेस बागबान यांच्या मोबाइल नंबर 8149848386 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावे, असे बागबान जमियत चे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल  यांनी केलं आहे.