Type Here to Get Search Results !

इयत्ता ३ री ते १२ वी च्या कृमिक पाठ्य पुस्तकात मनुस्मृति ; अल्पसंख्य-बहुजनातून शासनाचा निषेध


सोलापूर : राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विभागाने नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू केलेल्या अभ्यासक्रमात इयत्ता ३ री ते १२ वीच्या कृमिक पाठ्य पुस्तकात मनुस्मृति, मनाचा श्लोक, भगवत गीता तसेच महिलाविरोधी असे अनेक शब्द प्रयोग करण्यात आले त. त्याविरुध्द अल्पसंख्याक आणि बहुजन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत. राज्य शासनाचा हा प्रयत्न निंदनीय आणि निषेधार्य आहे, असा सूर  डाॅ. मौलाना आझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वेल्फेअर असोशियनच्या वतीने एक दिवसीय शिबीरात उमठला.

डाॅ. मौलाना अझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वेलफियर असोशियनच्या वतीने शनिवारी, ०८ जून रोजी मौलाली चौकातील राजमहल हॉलमध्ये एक दिवसीय शिबीराचे अयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य हारुन रशीद बागवान, निवृत्त विस्तार अधिकारी बशीर इंडीकर, हारुन करकमकर, मुस्ताक कानकुर्ती, अय्युब नल्लामंदू , शफी चोपदार, एम.डी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बशीर शेख होते.

याप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचा (शासनाचा) निषेध करत, शैक्षणिक अभ्यासक्रमातून मनुस्मृति वगळण्यात यावी, इयत्ता १ ली च्या प्रवेशासाठी ७ वर्षे पूर्णतेची अट रद्द करण्यात यावी, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ऊर्दु शाळेत शिकवण्यासाठी निवडण्यात आलेल्या अन्य समाजातील ७ उमेदवारांना सहशिक्षक पदावर ऊर्दू शाळेवर न पाठविता अन्य शाळेत पाठवावे, औरंगाबाद खंडपीठाने अल्पसंख्यांक शाळांसाठी शिक्षकांची पदभरती करताना टीईटी (TET) संबंधी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, तसेच सन २०२१ च्या जीआर प्रमाणे अल्पसंख्यांक शाळांमधील रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदभरती करण्याची त्वरित अमलबजावणी करावी, असे ०५ प्रस्ताव यावेळी मांडण्यात आले, त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले. ते सर्वानूमते मंजूर करून ठराव करण्यात आले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,रिजवाना बेलिफ, अरेफा शेख, अमिना शाहपूरे, शबनम आवटे, इरफान शेख, समीर कुरेशी, जमाल शेख, हारुण तांबोळी, जूबेर हिप्परगी, अकिब शेख, अजम अड्डेवाले, रौफ शेख, रमजान चिंचोळकर, शिवकुमार चलवादी, एजाज कुमटे गफूर सौदागर यांनी परिश्रम घेतले.

.... चौकट ....

नूर चॅरिटेबल ट्रस्ट उचलणार अल्फिया पठाण हिच्या मेडिकल प्रवेशाचा पहिल्या वर्षाचा फी चा खर्च : प्रा, चोपदार

या शिबीरात नीट परिक्षेत ९७.३३ गुण प्राप्त केलेल्या झोपडपट्टीत भाड्याच्या घरात राहत, अंत्यत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करित असलेल्या अल्फिया पठाण या विद्यार्थींनीचा या शिबीरात संघटनेच्या वतीने तिच्या पाल्यांसमवेत शाॅल, श्रीफळ देऊन सत्कार करून  तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हे पाहता उपस्थित असलेले प्रा. मोहम्मद शफी चोपदार उपाध्यक्ष नूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अल्फिया पठाण हिस मेडिकल प्रवेशासाठी पहिल्या वर्षाला लागणारी फी देण्याचे जाहीर केले.