सोलापूर : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशियन व ग्रीन फिंगर्स स्कूल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन टी-20 सामने इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान) येथे १२ जून पासून सुरू असल्याची माहिती सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी सोशल मिडियाद्वारे दिलीय.
या सामन्यास लागणारे बॉल क्रिकेट असोसिएशन देणार आहेत. या सामन्याची प्रवेश फी ६, ००० + १८ टक्के GST (५४० रुपये) याप्रमाणे असणार आहे. सामने T/20 बाद पध्दतीने असून पावसामुळे काही बदल झाल्यास कळविण्यात येईल. कुठलेही सामने ऐन वेळेस बदलता येणार नाही, टूर्नामेंट कमिटीचा निर्णय अंतिम असेल, असंही सांगण्यात आलंय.
या सामन्यांसाठी प्रथम पारितोषिक २१ हजार रूपये तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये असून इतर वैयक्तिक बक्षीसे या सामन्यासाठी ठेवण्यात आली आहेत, असं टूर्नामेंटचे कमिटीचे चेअरमन संजय वडजे यांनी म्हटलंय.
सर्व सामने आंतर राष्ट्रीय नियमाप्रमाणे खेळविण्यात येईल. सामन्यांचे लॉट्स ११ जून सकाळी ११ वाजता सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असो. ऑफिस मध्ये टाकण्यात येणार आहे. तरी सर्व संघाच्या प्रतिनिधीने वेळेत उपस्थित राहावे, अधिक माहिती व संपर्कासाठी दत्ता बडगु : 9823 96 3496, सादिक शेख : 9850 73 3453 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असं सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी म्हटलंय.