सोलापूर : श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित करजगीच्या शावळ (ता.अक्कलकोट) येथील श्री कुमारेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी धनंजय अभिमन्यु सुतार यांची पदोन्नतीने निवड झाली.
श्री. सुतार मूळचे कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथील रहिवासी आहेत. गेली 32 वर्षे क्रीडासह हिंदी विषयाचे सहशिक्षक म्हणून ते अध्यापनाचे कार्य करत आहेत. सोलापूर जिल्हा हिंदी शिक्षक संघटनेचे अक्कलकोट तालुकाप्रमुख म्हणूनही ते कार्यरत आहेत. विविध क्रीडास्पर्धेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले आहे. संस्थेने नुकतीच त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. दयानंद उंबरजे, संस्थेचे सचिव विवेकानंद उंबरजे, प्राचार्य एस.बी.बिराजदार यांच्यासह संचालक मंडळ आणि श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला आणि व्होकेशनल काॕलेज, श्री, कुमारेश्वर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.