Type Here to Get Search Results !

अल्फीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दींची मदत; भविष्यात देखील मदतीचे आश्वासन


झोपडपट्टीत राहणारी विद्यार्थीनी अलफीया चं एमआयएमकडून कौतुक

सोलापूर : सोलापुरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली आहे. विजापूर नाका परिसरात असलेल्या ०२ नंबर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फीया पठाणचे यश पाहून सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोलापूर जिल्हा आणि शहराचे एमआयएम प्रमुख हाजी फारूक शाब्दी यांनी बुधवारी सायंकाळी अल्फीया पठाण याच्या घरी जाऊन पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

अल्फिया पठाण याचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर आई कपड्याच्या दुकानात रोजंदारीवर काम करते. भाड्याच्या एकाच खोलीत पठाण कुटुंबीय राहत आहे. मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, त्यासाठी समाजातर्फे आणि एमआयएम तर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी सांगितली.



अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 गुणांपैकी 617 गुण प्राप्त केले आहे. मुस्लिम समाजातील अलफीया पठाण एकमेव विद्यार्थीनी आहे, नीट परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. देशभरातील अनेक पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याना खाजगी शिकवणी लावून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी धडपड करत असतात.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास, नीट ही स्पर्धा परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अल्फियाने नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात मेरिट मध्ये उत्तीर्ण केली आहे. सर्व समाजातील गोरगरीब, कष्टकऱ्यासाठी झटणारे एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात देत आधार दिलाय.



एमआयएमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाजी फारूक शाब्दी यांच्यासोबत अल्फीया पठाणच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला. अलफिया ला रोख स्वरूपात ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. भविष्यात काही मदतीची गरज वाटल्यास एमआयएम सदैव तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन दिले.

यावेळी जुबेर शेख, जुबेर सय्यद, इलियास शेख, नासिर मंगलगीरी, एजाज बागवान, राजा बागवान, नदीम डोणगांवकर, मोहसिन मैंदर्गीकर, शोहेब चौधरी, मुजम्मील वड्डो आदी उपस्थित होते.

...चौकट...

अल्फिया पठाण माझी प्रेरणा : फारुख शाब्दी

डॉक्टरांची पाल्य डॉक्टर होताना अनेकदा पहिली आहेत. वकिलांची मूलं-मुली वकिली व्यवसायात असतात. अलफीया पठाण ही भाजी विक्रेत्याची मूलगी डॉक्टर होताना लवकरच नजरेस पडणार आहे. राजकारणात नेत्यांची मूल-मुली मंत्री, आमदार, खासदार होतात. आगामी काळात ही प्रथा मोडीत काढत आपण आमदार बनू, असा माझा विश्वास आहे.