सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रतिस्पर्ध्यावर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. या आनंदाचा क्षणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागात भर पावसात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
पुरोगामी विचारसरणीच्या प्रणिती शिंदेंना संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते, प्रणिती शिंदे यांचा विजय जाहीर होताच, जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, सिताराम बाबर, अरविंद शेळके, सुलेमान पिरजादे, महेश भंडारी, रमेश चव्हाण, विजय बिल्लेगुरु, नितीन देवकते, राजेश चव्हाण, दत्ता पवार, आकाश चव्हाण, श्रवण साळुंखे, मल्लिकार्जुन शेवगार, विश्वनाथ माने, रवी शिनगारे, विजयकुमार जावळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.