Type Here to Get Search Results !

हास्यकवी अशोक नायगांवकरांच्या ' मिष्कीली आणि कविता ' मध्ये रसिक श्रोते चिंब-चिंब भिजले


सोलापूर : पुनर्वसु नक्षत्राचा पावसाने रविवारी सोलापूरकरांना अक्षरक्षः धुवून काढले, त्यातच ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिष्कीली आणि कवितांच्या कार्यक्रमातून उपस्थिती रसिक श्रोत्यांना चिंब भिजवले. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिष्कीली आणि कविता या कार्यक्रमाचे रविवारी, ०९ जून रोजी सायंकाळी ०६ वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्या नगरमध्ये अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.

दिवसभर मोकळे आकाश असल्याने सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल, असे वाटले असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली, तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसाने बरसण्यास सुरूवात केली. एकीकडे पाऊस बरसत होता तर कार्यक्रमात हास्यकवी अशोक नायगांवकर हे आपल्या मिष्कीली आणि कवितांची बरसात करीत होते. उपस्थित रसिक मात्र मिष्कीली आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते. 

लोकमान्य टिळक, बहीणाबाई चौधरी, विं.दा. करंदीकर यांच्यावरील कविता तसेच ' माय ' ही गाजलेली कविता सादर केली, अन् मिष्कीलीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडीवरही त्यांनी प्रकाश टाकला त्यातून रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.



प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका अविनाश महागांवकर यांनी स्वागत केले. हास्यकवी अशोक नायगांवकर यांची ओळख महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे यांनी करून दिली. त्यानंतर कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले, तर अमोल धाबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, पृथा हलसगीकर, राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. प्रदीप देशमुख, सिध्देश्‍वर किणगी, अविनाश पत्की, राजु म्हमाणे, ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांच्या पत्नी वसुधा हलसगीकर, श्रृती शुभम महागांवकर, विशाल शिंदे, वंदना ताटे, सृष्टी ताटे, लता प्रदीप देशमुख, सोलापूर कारागृह अधिक्षक हरिभाऊ मिंड आदींसह मान्यवर उपस्थित होते.