सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त परिवहन चालक तथा रखवालदार निराळे वस्तीतील रहिवासी किसन महादेव येच्चे यांचे शनिवारी, ०८ जून रोजी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी ६६ वर्षीय होते.
रविवारी, ०९ जून रोजी सकाळी ११ वाजता बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील कोटमाळ या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक 'संचार' चे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांचे ते वडील होत.