Type Here to Get Search Results !

अभिमान देशाचा ... स्वाभिमान सोलापूरचा ! साऊथ एशिया स्पर्धेत पंचाक्षरीला गोल्ड मेडल


सोलापूर : जिल्ह्याचा गुणी खेळाडू पंचाक्षरी लोणार याने मालदीव येथे संपन्न झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेत ७० किलो गटात गोल्ड मेडल प्राप्त केले. अनेक राष्ट्रीय स्पर्धेत लोणार ने गोल्ड पदक जिंकले आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हे पहिलेच पदक प्राप्त केले.



BR नेटवर्कचे संचालक रविंद्र पाटील यांनी गेली अनेक वर्ष सातत्याने लोणारला सहकार्य केले आहे. त्याचबरोबर उद्योजक शरद ठाकरे यांनी देखील लोणारला सहकार्य केले. या स्पर्धेसाठी पंचाक्षरीला आमदार सुभाष देशमुख यांनी सहकार्य केले तर संघटनेचे उपाध्यक्ष संजय हिरेमठ यांनी मदत केल्याचं सांगण्यात आलंय.

लोणार हा जुळे सोलापुरातील मॅक्सिमम जिमचा खेळाडू असून अन्वर शेख सर यांनी प्रशिक्षण दिले तर संघटनेचे सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 


या यशाबद्दल वर्ल्ड बॉडी बिल्डिंगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, हिरेल मॅडम, विश्व चँम्पियन प्रेमचंद डोग्रा, महाराष्ट्र चे अध्यक्ष सावंत, सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, राजेश वडाम, सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग चे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, शशिकांत अक्कळवडी, अविनाश गंजे, संघटक आतिष शिंदे , सहचिटणीस आतिक नदाफ यांनी अभिनंदन केले.