राज्य फेडरेशन व सोलापूर जिल्हा संघटनेने केलेल्या वारंवार प्रयत्नाला यश !
सोलापूर : राज्य फेडरेशन व सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर, राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात नवीन 4G तंत्रज्ञानावर आधारित पोज मशीन जागतिक अन्नसुरक्षा दिनाचे औचित्य साधत शहरातील तीनशेहून अधिक दुकानदारांना शुक्रवारी, ०७ जून रोजी वितरीत करण्यात आल्या.
रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होत्या. मूळतः ०७ वर्षांपूर्वीच्या अन् जुन्या 2G तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या पोझ मशिन नेटवर्क संथ गतीने चालत होत्या, ह्याचा त्रास म्हणून ग्राहकांना तासनतास धान्यासाठी रांगेत उभं राहावं लागत होते. अनेकदा नेटवर्कअभावी धान्य वाटप देखील बंद करावं लागत होतं.
ह्यावेळी परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, अनिल गवळी, जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख, उमेश आसादे, शिवशंकर कोरे, बापू गंदगे, झोन अध्यक्ष अभिजित सडडो, बसवराज बिराजदार, जुबेर खानमियॉ, हर्षल गायकवाड, जिल्हा सचिव राज कमटम, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ऑपरेटर व बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते.