मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, जिल्हा सल्लागार मुख्याध्यापक सुरेश भोसले, जिल्हा खजिनदार दाऊत आतार, संघटक सिद्धेश्वर भुरले यांनी मंगळवेढा तालुक्याचा धावता दौरा केला. यावेळी तालुक्याच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठल एककल्ली, सिद्धेश्वर अवघडे, तांबोळी सर, बबन भोसले, खंडू कोकरे, श्रीकांत कांबळे, मेटकरी सर, माळी सर यांच्यासह अन्य तालुका पदाधिकारी-सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ मंगळवेढा तालुका धावत्या दौऱ्यात घेतलेले छायाचित्र.