Type Here to Get Search Results !

जिजाऊ ज्ञान मंदिरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी; सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण


सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चा दहावीचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे शंभर टक्के लागला. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. 

सध्याच्या काळामध्ये इंग्रजी अवगत असणं काळाची गरज आहे. ही गरज ओळखून शेतकरी आणि कष्टकऱ्याची मुलं इंग्रजी शाळेत शिकून मोठी व्हावीत, ही विचारधारा ठेऊन या संस्थेची स्थापना झाली होती. आज याच संकुलातून अनेक विद्यार्थी उत्तुंग यश मिळून भावी आयुष्य उज्ज्वल करत असल्यामुळे आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याच्या भावना संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी व्यक्त केली.

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये या जिजाऊ ज्ञान मंदिरातील विशेषतः मुलींनी बाजी मारली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थेच्या वतीने कौतुक होत असून सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष गणेश निळ आणि शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. 

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: 

प्रथम क्रमांक: सानिका बिभीषण चौगुले: 87.60 टक्के

द्वितीय क्रमांक: मानसी नानासाहेब खंदारे:- 86.60 टक्के

तृतीय क्रमांक : रेहनुमा असगर खान 84.80 टक्के

दहावीच्या परीक्षेसाठी जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधून एकूण 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 34 पैकी 29 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण व 5 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले.

यावेळी प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे, वैभव मसलकर, दिलीप भोसले, रावसाहेब नीळ आधी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.