अक्कलकोट : तालुक्यातील चपळगांव ग्रामपंचायतमध्ये चाळीस वर्षांची दीर्घ सेवा दिलेले कर्मचारी ज्ञानदेव विठोबा सुरवसे (वय-८२ वर्षे) यांचे वृध्दापकाळात अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या बुधवारी, सकाळी १०.०० वाजता चपळगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पत्रकार अशोक सुरवसे, प्रकाशराव सुरवसे व स्वामीनाथ सुरवसे यांचे ते वडील होत. मयत ज्ञानदेव सुरवसे हे निष्ठावंत व तत्वज्ञानी होते. ते ज्ञानु या नावाने सुपरिचीत होते.