सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त विधी अधिकारी ॲड. विठ्ठल शंकरराव गोंडाळ यांचं वृध्दापकाळात मंगळवारी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. महापालिकेत सेवेत असताना गोंडाळ यांनी अनेक न्यायप्रवीष्ट प्रकरणांमध्ये महापालिकेची बाजू समर्थपणे सांभाळली होती. ते मृत्यूसमयी ९० वर्षीय होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री मोरे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते इंडियन एक्सप्रेस-लोकसत्ताच्या पुणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) अमित गोंडाळ यांचे वडील होत.