सोलापूर : येथील पापासेठ बलदवा जनहित निधी ट्रस्ट, या ट्रस्टचे संस्थापक गिरीश बलदवा व विनय बलदवा यांच्यातर्फे सोलापूर पोलीस आयुक्तालय कार्यालयास मंगळवारी, २८ मे रोजी २२० लि. पाणी क्षमता असलेले ०१ वॉटर कुलर आणि वॉटर प्युरीफायर सप्रेम भेट देण्यात आले.
सदर वॉटर कुलरचा लाभ आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच आयुक्तालयास भेट देणाऱ्या नागरिकांना होणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गिरीश बलदवा व विनय बलदवा यांचे आभार मानले.
यावेळी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस आयुक्त (प्रशासन) राजन माने, पोलीस निरीक्षक (मानव संसाधन विकास) उदयसिंह पाटील, पोहेकॉ अविनाश शिंदे, पोहेकॉ संजय सर्जे, पोहेकॉ बाबु मंगरुळे, पोकॉ संतोष चाबुकस्वार, पोकॉ अमोल कानडे, मपोकॉ शैला खामकर उपस्थित होते.