सोलापूर : भगवान बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने जाणे सध्या महत्त्वाचे आहे. जगाला ' युद्ध नको, बुद्ध हवा ' हा संदेश सर्वांनी अंगीकारला पाहिजे, असं प्रतिपादन माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांनी केले.
जगाला शांतीचा मार्ग दाखविलेले तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या २५८७ व्या जयंतीदिनानिमित्त {लुंबिनी, वैशाख पौर्णिमा इ.स.पूर्व.५६३} उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हगलूर येथे तथागतांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती भडकुंबे बोलत होते.
'अत्त दिप भव' ' स्वंय प्रकाशित व्हा' हा विचार देऊन लोकांना अज्ञानाच्या अंधःकारातून मुक्त केले. वैचारिक गुलामगिरी नष्ट करुन आपल्या सदसद्विवेकबुद्धीला शरण जाण्याचा राजमार्ग देऊन ज्ञानी होण्यासाठी प्रेरित केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आधारावर लोककल्याणकारी समाजरचना असलेल्या 'बौद्ध धम्माची' निर्मिती केली, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी बुध्द जयंतीनिमित्तानं महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभिजीत भडकुंबे, पाटील जानराव, भुजंगा गायकवाड, शशिकांत गायकवाड, किरण गायकवाड, दत्ता माने, चंद्रकांत गायकवाड, अमित भडकुंबे व मंडळाचे-एसबी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी -कार्यकर्त्यांसह महिला यावेळी उपस्थित होत्या.