(प्रतिकात्मक छायाचित्र)
कासेगांव/संजय पवार
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील कासेगाव कला आणि वाणिज्य महाविद्यालय चा इयत्ता बारावी चा निकाल लागला. कला शाखा निकाल ८६.२० टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८४.१७ टक्के लागला. सर्व विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कला शाखा
१)जयश्री धोंडिबा बाळशंकर ७१.०० टक्के
२)प्राजक्ता गोरख ढवळे ७०.१७ टक्के
३)भाग्यश्री बापू जाधव ६६.०० टक्के
वाणिज्य शाखा
१)प्रशांत प्रभाकर म्हेत्रे ६९.०० टक्के
२)सानिया रसूल शेख ५७.३३ टक्के
३)जैद सलीम पठाण ५७.०० टक्के
संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले, सचिव सच्चीदानंद दिलीपराव चौगुले, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बोधीप्रकाश गंगाराम गायकवाड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले.
....
हर्षवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८७.५० टक्के; सोनाली झांबरे प्रथम क्रमांकाची मानकरी
उत्तर सोलापूर तालुक्यातील हर्षवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हिप्परगे तळे या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ८७.५० टक्के लागला. या कनिष्ठ महाविद्यालयात निकालात मुलींनी बाजी मारली. कु. सोनाली राजू झांबरे हिने ७९.८३ टक्के गुण प्राप्त करून कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलीय.
कु. गौरी सतीश धडे हिने ६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर रामलिंग माणिक कांबळे यांने ६४.८३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम श्रेणीमध्ये ०८ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य लक्ष्मण राऊत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं अभिनंदन केलंय.