उत्तर सोलापूर/कय्युम जमादार
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता एच. एस. सी. कला शाखेचा निकाल ८८.८८ टक्के लागला. महाविद्यालयातून राशी सीताफळे ७१.६७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, करण डोलारे ६६.०० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर प्रिया गायकवाड हिने ६५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे (माजी सभापती) व संस्थेच्या संचालिका रजनी भडकुंबे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले.