Type Here to Get Search Results !

शहर पोलीस 'या' महिण्यात ५९ टक्क्यावर ... पोलीस आयुक्तांनी दिला वर्षभरातील कामगिरीचा आलेख



सोलापूर : शहरातील सन २०२४ मध्ये दाखल असलेल्या घरफोडी वाहन चोरी,जबरी चोरी आणि इतर चोरीचे असे  ३२२ गुन्ह्यापैकी १३२ गुन्हे उघडकीस आणत ४३ लाख २६  हजार ९७३ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. मे महिण्यात दाखल गुन्हे लक्षात घेता, उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना उल्लेखनिय यश आलं आहे. याची टक्केवारी ५९ टक्के आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहर पोलिसांनी माहे मे २o२४ मध्ये घरफोडीचे ६१ दाखल गुन्ह्यापैकी ४१ गुन्हे, जबरी चोरीतील ११ दाखल गुन्ह्यापैकी ०९ गुन्हे तसेच वाहन चोरीचे १६३ दाखल गुन्ह्यापैकी ८३ गुन्हे व इतर चोरीचे ८७ गुन्ह्यापैकी ५७ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आलं आहे. याची टक्केवारी ५९ टक्के आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. 

शहरातील नागरिकांनी चोरी बाबतच्या घटनांची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना मदत होईल, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी यावेळी केलं.

-----------

सराईत गुन्हेगारांनाही ठोकल्या बेड्या

एमआयडीसी पोलीस ठाणे पोलिसांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शरणाप्पा सिद्धाप्पा काळे (वय ३६) यास अटक करून घरफोडीचे चार गुन्हे आणत २ लाख ५८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

विजापूर नाका पोलिसांनी कल्याण येथील सराईत गुन्हेगार सॅमसंग रुबीन डॅनियल  (वय-२५वर्षे) यास बेड्या ठोकत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ज्वेलर्स दुकानातून चोरी करणाऱ्या बुरखाधारी ३ महिलांना ताब्यात घेऊन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले, तसेच सदर बाजार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या चार आरोपींना ताब्यात घेऊन तहसीलदार कार्यालय येथून चोरीस गेलेले ०७ लाख रुपये किमतीचे ०२ ट्रॅक्टर व ०२ ट्रॉली हस्तगत केले असल्याचे एम. राजकुमार यांनी यावेळी सांगितले.