Type Here to Get Search Results !

०२ गुन्ह्याचा उकल; विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून ३.४३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत


एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचं यश

सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या चोरी-घरफोडीच्या २ गुन्ह्याचा उकल होण्याच्या अनुषंगाने पो.कॉ. सुहास अर्जुन यांना मिळालेल्या गोपनिय खबरीनुसार एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळील कापडी पिशवीतील ०२ कॅरी बॅगच्या झडतीत २, ८०, २१० रुपयांची सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण ३, ४३, ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एमआयडीसी हद्दीत आर.एस. इंडस्ट्रीज सी. १२/२२, टॉवेल कारखान्यात झालेल्या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं २९२/२४ भादविस कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये दाखल गुन्ह्याचा उकल होण्यासंबंधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि नंदकिशोर सोळुंके यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने गस्त घालीत असताना पोकॉ/१६१८ सुहास अर्जुन यांना मिळालेल्या गोपनिय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन २८ मे रोजी सकाळी मुळेगांव रस्त्यावरील गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर डी. बी. पथकाने विधीसंघर्ष ग्रस्त बालकास ताब्यात घेतलं.

त्याच्या हातामध्ये असलेल्या एक कापडी पिशवी असलेल्या दोन कॅरीबॅग मध्ये गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी एका कॅरिबॅग मध्ये एमआयडीसी गुरन २९२/२४ मध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम २, ३८, २१० रूपये व दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याकडील दाखल गुरनं ३२४/२४ भादविस कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ४२ हजार रुपयांची रोख रक्कम व ०७ ग्रॅम सोन्याचे दागिणे व १५.०५ चांदीचे दागिने असे एकूण १, ०५, ६५० रुपयांचा मुद्देमाल त्या कापडी पिशवीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.

विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाणेकडील ०२ गुन्हे उघडकीस करुन त्याच्याकडून ३, ४३, ८६० रुपयां चा मुद्देमाल हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलं आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पो.नि. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पो.हे.कॉ. राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पो. ना. मंगेश गायकवाड, पो.कॉ. सुहास अर्जुन, शंकर यालगी, काशिनाथ वाघे, शैलेश स्वामी, दिपक नारायणकर, अमोल यादव, आमसिध्द निंबाळ, अमर शिवशिंगवाले, भारत तुक्कुवाले, अजित माने आणि देवीदास कदम यांनी पार पाडली.