सोलापूर/सुहेल शेख : पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा मंडळाने फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या एच. एस. सी. परिक्षेचा निकाल मंगळवारी, २१ मे रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात एम. ए. पनगल कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील एकूण ३३४ विद्यार्थी बसले होते, त्यात ३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व विज्ञान शाखेच्या निकाल ८८.८५ टक्के इतका लागला. त्यात विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचा निकाल ६५.६७ टक्के इतका लागला. विज्ञान व कला शाखेचा एकूण निकाल ८८.९६ टक्के इतका लागला. पानगल कनिष्ठ महाविद्यालयात राजभरे ईरम साजिद ८४.८३ टक्के गुण घेऊन प्रथम आली. खमितकर आरयन राजेश ८०.१७ टक्के गुण प्राप्त करून दुसरा आला तर अहमद उमैमा अब्दुल मलिक ही ७९.१७ टक्के घेऊन तिसरी आली. तसेच राजभरे ईरम उर्दू विषयात ९६ गुण घेऊन प्रथम आली तर अहमद उमैमा ही भूगोल विषयात ९५ गुण घेऊन प्रशालेत प्रथम आली.
सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान यांचे हस्ते पुष्गुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. बारावी परीक्षेच्या निकाल झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. हारुन रशीद बागबान, उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार, निकहत नल्लामंदू तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले.