मोहोळ : येथील लोकनेते पॅलेस येथील बंद खोल्यामध्ये जुगार अड्डयावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शुभम कुमार यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मंगळवारी धाड टाकलीय. या पॅलेसच्या छताखाली ३८ जुगारी आढळले. त्यांच्या ताब्यातून २,२३,९०० रुपयांची रोकड, लाखोंच्या किंमतीची चार चाकी वाहने आणि जवळपास ३० हून अधिक महागड्या किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी पहाटेपूर्वी मोहोळ पोलीस ठाण्यात ३८ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कामगिरी म्हणून जुगार अड्ड्यावरील छापा म्हणून याकडे पाहिलं जातंय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सोलापूर ग्रामीण पोलीस पंढरपूर उपविभागाकडील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी शुभम कुमार यांनी त्यांच्या पथकासह मोहोळ येथील 'लोकनेते पॅलेस ' वर छापा टाकला. या धाडीत गोलाकार बसून ५२ पत्यांच्या पानांवर तिरट नावाचा जुगार खेळ असताना २२ जण पोलिसांच्या हाती लागले. दुसऱ्या मजल्यावरील झाडा-झडतीत १६ जण तिरट खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ५००, २००, १००, ५०, २०, १० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा अशी एकूण २, २३, ९०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
कालपर्यंत मोहोळची राजकारणाचं केंद्र अशी ख्याती होती, या जुगार अड्ड्यावरील धाडीनं अवैध धंद्याचं केंद्रबिंदू अशी ख्याती मिळवण्याकडे वाटचाल दिसून येतेय. पोलिसांनी ताब्यात घेतलेले ३८ जण जवळपास राज्याच्या अनेक जिल्ह्यातून या 'पॅलेस' मध्ये तिरट जुगार खेळण्यासाठी एकत्र आले होते.
या कारवाईत महिंद्रा धार जिप (MH13EC6868), मारुती सुझुकी बलेनो कार (MH13DT2422), महिंद्र कंपणीची XUV (MH13AC0002), फोक्स वॅगन कंपणीच विटो कार (MH13BN 3312), मारुती सुझुकी कंपणीची स्विफ्ट डिझायर कार (MHI3DE7740) आणि मारुती सुझुकी कंपणीची स्विफ्ट डिझायर कार (MH42AL4554) अशा कंपनीची महागडी वाहने जप्त करण्यात आल्याच सांगण्यात आलंय. या छाप्यात ॲपल, सॅमसंग, विवो अशा विविध कंपन्यांचे कमीत कमी ०५ हजार रुपयांपासून ते १ लाख रुपये किमतीपर्यंतचे जवळपास ३० हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आलेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात जुगार अड्ड्यावरील सर्वात मोठा छापा म्हणून याकडे पाहिलं जातंय.
याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सुनील किसन मोरे (बक्कल नंबर/१४८) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं ३२०/२०२४, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम ४, ५ प्रमाणे ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.पो.ना./१४३६ घोळवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
▶️ हे आहेत आरोपी:
१) रियाज बासु मुजावर (वय-३८ वर्षे, रा. दत्तनगर मोहोळ),
२) विनायक निलकंठ ताकभाते (वय- ४३ वर्षे, रा. अवंतीनगर, जुना सोलापूर नाका, सोलापूर),
३) फारुख शेख याकुब (वय ३८ वर्षे, रा. ओमनगर, सुरत, राज्य गुजराथ),
४) मितीन सारंग गुंड (वय ३७ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ),
५) ओंकार विजय चव्हाण (वय २७ वर्षे, रा. चिंचनाका, चिपळूनण, जि. रत्नागिरी),
६) राजू लक्ष्मण भांगे (वय २८ वर्षे, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर),
७) महादेव बंडोबा पवार (वय-३५ वर्षे, रा. १४७, दक्षिण कसबा, सोलापूर),
८) मनोज नेताजी सलगर (वय-४२ वर्षे, रा. नवीपेठ, सोलापूर)
९) स्वप्निल प्रविण कोठा (वय-३५ वर्षे, रा. राजीव नगर, सोलापूर)
१०) रोनक नवनीत मर्दा (वय-२८ वर्षे, रा. मर्दा मंगल कार्यालय, सोलापूर),
११) हर्षल राजेंद्र सारडा (वय-३५ वर्षे, रा. वर्धमान नगर, सोलापूर),
१२) कृष्णा अर्जुन काळे (वय-४७ वर्षे, रा. संजय गांधी नगर, विजापूरनाका, सोलापूर)
१३) अनिल किसन चव्हाण (वय ५२ वर्षे, रा. अलराईन मगर, सांगोला),
१४) धानप्पा प्रकाश भदरे (वय-४६ वर्षे, रा. नवी पेठ, सोलापूर),
१५) अबरार करीम फकीर (वय-५६ वर्षे, रा. उकताड गणेश मंदीर, चिपळूण, जि. रत्नागिरी),
१६) लखन जगदीश कोळी (वय-३३ वर्षे, रा.समर्थ नगर, मोहोळ),
१७) सोमनाथ दादासाहेब मोरे (वय-२९ वर्षे, रा. दत्त नगर, मोहोळ),
१८) महादेव मुरलीधर दगडे (वय-३९ वर्षे, रा. करोळे, ता. पंढरपूर),
१९) राम बलभिम कदम (वय-५४ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ),
२०) कृष्णा कल्याण राऊत (वय-३७ वर्षे, रा. बागेचीवाडी, अकलूज, ता. माळशिरस),
२१) विलास धर्मराज कडेकर (वय-४० वर्षे, रा. कुप्पा, ता. वडवणी, जि. बीड),
२२) सुशिल कैलास लंगोटे (वय-४४ वर्षे, रा. श्रीराम नगर, माढा) अशी आरोपींची नांवे आहेत.
तसेच दुसऱ्या मजल्यावर
२३) दिपक चंदकांत गायकवाड (वय-४२ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ),
२४) राजू हसन शेख (वय-४६ वर्षे, रा. पोखरापूर, ता. मोहोळ),
२५) आयाज इब्राहिम सय्यद (वय-३५ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर, मोहोळ),
२६) दिनेश सुखदेव चवरे (वय-५२ वर्षे, रा. पेनूर, ता. मोहोळ),
२७) बालाजी केरबा भोसले (वय-५४ वर्षे, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर),
२८) ओंकार नेहरु बरे (वय-३० वर्षे, रा. बुधवार पेठ, मोहोळ),
२९) आप्पा सिद्राम पाटील (वय-४७ वर्षे, रा. घोडेश्वर, ता. मोहोळ),
३०) एकनाथ भगवान चांगीरे (वय-५१ वर्षे, रा. परळी, जि. बीड),
३१) विशाल रघुनाथ क्षीरसागर (वय-२९ वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, मोहोळ),
३२) संभाजी सोपान कवितकर (रा. अनगर, ता. मोहोळ),
३३) फिरोज बाबू शेख (वय-४५ वर्षे, रा. गुलशाननगर मोहोळ),
३४) सिताराम रामचंद्र कुंभार (वय-२४ वर्षे, रा. समर्थ नगर, मोहोळ),
३५) सज्जन लक्ष्मण शेळके (वय-३७ वर्षे, रा. कोन्हेरी, ता. मोहोळ),
३६) गोविंद महादेव पाटील (वय-४० वर्षे, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर),
३७) प्रशांत प्रकाश पाटील (वय-४५ वर्षे, रा. वैराग, ता. बार्शी) आणि
३८) सोमनाथ भिमराव जोकारे (वय - ५४ वर्षे, रा. कांदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.