Type Here to Get Search Results !

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

                                                       (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS)  या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथे नवयुवक व नवयुवयतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट  2024 या  कालावधीत CDS कोर्स आयोजित करण्यात येत आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीं निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 30 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मुलाखतीस हजर रहावे.

मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट सर्च करून त्यामधील  CDS-63 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे.

सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत. सदर प्रवेशासाठी उमेदवार हा कोणत्याची शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस.(CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयाीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.