सोलापूर : सांगोला तालुक्यातील हातीद येथील मूळच्या रहिवासी आणि हल्ली दक्षिण काशी पंढरपुरात वास्तव्यास असलेल्या श्रीमती मंगल गणपतराव पाटील यांचं अल्पशः आजाराने निधन झाले. त्या मृत्यूसमयी ७० वर्षीय होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र व सध्या हैदराबाद येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी डॉ. संग्रामसिंह पाटील यांच्या त्या मातोश्री होत.