सोलापूर : येथील मेसॉनिक चौकातील प्रसिध्द संगीत वाद्यांचे उत्पादक, मिरजकर ॲन्ड सन्स फर्मचे मालक एजाज कुतुबुद्दीन मिरजकर (वय ४६) यांचे हृदयविकाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन बंधू, दोन भगिनी असा परिवार आहे.
मिरजकर घराण्याचा संगीत वाद्य उत्पादनाचा पिढीजात व्यवसाय आहे. एजाज मिरजकर यांनी संगीत वाद्य निर्मितीसह कॕरम बोर्ड उत्पादन आणि विक्री व्यवसायात लौकिक मिळविला होता. दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन मिरजकर यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पार्थिवावर दफनविधी (सुपूर्द-ए-खाक) अक्कलकोट रस्त्यावरील जडेसाब बंगला कब्रस्तानात रविवारी सायंकाळी झाला.