Type Here to Get Search Results !

ग्राहक, हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव... ! सुधा उपाहारगृहाचे शानदार उद्घाटन; १६ मे पासून ग्राहकांच्या सेवेत रूजू


सोलापूर/प्रतिनिधी: मातृदिनी सुधा उपाहारगृहाच्या दुसर्‍या शाखेचे मोदी रेल्वेलाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आले. मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फित कापून आणि पूजा करून रविवारी, १२ मे रोजी सायंकाळी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. 

यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अशोक किणगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हे सुधा उपाहार गृह १६ मे पासून ग्राहकांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


गेल्या ६ दशकापासून सोलापूरसह आजुबाजूच्या परिसरामध्ये ईडली सांबार, चटणी आणि मस्का स्लाईसची चव ग्राहकांना चाखायला देणार्‍या किणगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपण्याचे काम केले. सोलापूर मध्ये मंगळवार पेठ, जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा ईडली गृह तथा सुधा उपाहार गृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वेलाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमातीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकुलित वातावरणात सुधा उपाहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला. सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ झाला. 



या कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौनतपस्वी श्री. म. नी. प्र. जडेय शांतलिंगेश्‍वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पध्दतीने आर्शिवाद दिले. यावेळी बसवराज शंकरराव किणगी, सिध्देश्‍वर शंकरराव किणगी, गंगाधर विश्‍वनाथ किणगी, अशोक विश्‍वनाथ किणगी तसेच किणगी परिवारांवर शहर परिसरातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.



या कार्यक्रमासाठी सिध्देश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, हर्षल खरटमल, माजी आमदार दिलीप माने, उद्योजक यतीन शहा, हर्षल कोठारी, माजी महापौर अलका राठोड, शहाजी पवार, अविनाश महागांवकर, प्रशांत बडवे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड, मंगळवार पेठ, चाटी गल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका श्‍वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली.