Type Here to Get Search Results !

आर्यनंदी परिवार रौप्यमहोत्सवानिमित्त ९ जून रोजी "शुभमंगल" सकल जैन वधू-वर पालक परिचय मेळावा


सोलापूर : आर्यनंदी परिवाराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त, आर्यनंदी परिवार संचलित व "आर्यनंदी एज्युकेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन" आयोजित, "शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन, रविवारी, ०९ जून रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० या वेळेमध्ये, श्री मारूती मंगल कार्यालय, आर्य चाणक्य नगर, ओम गर्जना चौकाजवळ, सैफूल, विजापूर रोड, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत २९९ वधूवरांची नोंदणी झालेली असल्याची माहिती संयोजक डॉ. राजेश र. फडकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प. पू. १०८ आचार्य आर्यनंदी महाराजांच्या विचारातून आणि कर्यातून प्रेरणा घेऊन, त्याच्या शुभाशिर्वादाने स्थापन झालेला "आर्यनंदी परिवार" आज आपणा सर्वांचं सहकार्य व विश्वासाच्या बळावर रौप्यमहोत्सवाकडे यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सुरू केलेल्या आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था, आर्यनंदी निधी क्मनी, आर्यनंदी एज्युकेशन अॅन्ड रिसर्च फौडेशन, आर्यनंदी इन्झस्ट्रक्बर, आर्यनंदी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आर्यनंदी सदेश (मासिक) यासारख्या आर्थिक क्षेत्राबरोबरच सहकार, साहित्य, आरोग्य, सामाजिक, बाधाम्, शैक्षणिक कला, कीडा तसेच पत्रकारिता क्षेत्रात परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य केल्याने, "आर्यनंदी परिवार" हा महाराष्ट्रातील एक गौरवांक्ति परियार आहे.

या मेळाव्यास राज्यातील विविध भागातून वधू-वर उमेदवार व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत. एकाच छत्राखाली अनेक वधू-वर उमेदवार स्थळाची संकलित माहिती माफक दरात उपलब्ध करून देणे, जेणेकरून सर्व-सामान्याच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

सकल जैन समाजातील सर्व विवाहेच्छूक उमेदवार व पालकांनी ऐनवेळेची नोदणी शुल्क भरून, बहुसंख्येने उपस्थित राहून, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आर्यनदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व मेळावा संयोजक डॉ. राजेश र. फडकुले, व मेळावा समिती सचिव बाहुबली दुरुगकर (9270210231),निलेश एखडे (8087531495), सुनिल वायकोस (जैन) (9823411008), महावीर जैन (9921589529), जीवनकुमार अन्नदाते (9762213233), सुरेशकुमार खुळे (9326581008) यांनी जाहीर आवाहन केले आहे.