Type Here to Get Search Results !

हरविलेल्या मोबाईलसंबंधी विचारणा; जीवे मारण्याचा प्रयत्न



सोलापूर : मुलाच्या हरविलेल्या मोबाईलसंबंधी विचारपूस केल्याच्या कारणावरून भारत भडंगे यांच्या डोक्यात लाकडाने प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. ही घटना देगांवातील साठे नगरात गुरुवारी सकाळी घडला. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलिसांनी स्वप्निल सुहास सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, देगाव साठे नगरातील रहिवासी अशोक भारत भडंगे यांचा मोबाईल हरवला होता. या हरविलेल्या मोबाईलसंबंधी भारत भडंगे यांनी स्वप्निलकडे विचारपूस केली. त्यावर स्वप्निल सावंत याने भारत भडंगे यांना शिवीगाळ करून त्यांच्या जीव घेण्याच्या उद्देशाने डोक्यात लाकडाने मारहाण केली. त्यात ते जबर जखमी झाले.

याप्रकरणी जखमीचा मुलगा अशोक भडंगे याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्वप्निल सुहास सावंत याच्याविरुद्ध भादवि ३०७,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मसपोनि वालकोळी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.