Type Here to Get Search Results !

'आनंदवन' मध्ये ०२ प्लॉट देण्याच्या नावाखाली फसवणूक


सोलापूर : वृत्तपत्रात विजापूर रस्त्यावरील सोरेगांव येथील गट क्र. १५४/१ अ ०१ हेक्टर २० आर क्षेत्रातील  प्लॉटींग योजनेची जाहिरात प्रसिध्द करुन राहुल एकनाथ बासुतकर या विकसकाने सौ. माया मनोहर औरंगाबादकर यांची फसवणूक केलीय. याप्रकरणी विकसक राहुल बासुतकर यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील रहिवासी राहुल बासुतकर यांनी, सन २०१४ मध्ये एका स्थानिक वर्तमानपत्रातून विजापूर रोड सोरेगांव येथील गट नं १५४/१ अ क्षेत्र १ हे २० आर या क्षेत्रात आनंदवन सुंदर प्लॉटची अभिनव योजना या मथळयाखाली ओपन प्लॉटस व रो हौसिंगची योजना दिशा रॉयल्टी मल्टिकन्स्ट्रक्शन यांनी यांनी प्रसिध्द केली होती. 

या जाहिरातीमध्ये त्यांनी आनंदवन वसाहतीचे डुप्लीकेट मुख्य गेट, अंतर्गत डांबरी रस्ते, पाण्याची व्यवस्था, सुसज्य गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, स्वतंत्र ७/१२ उतारा सोलापूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाची मान्यता व बिगरशेती केल्याची खात्री दिली होती. त्याप्रमाणे यातील फिर्यादी ने सदर दिशा रॉयल्टी मल्टिकन्स्ट्रक्शन मध्ये २ प्लॉट घेतले. प्लॉट  १४,४०,३०६ रुपयांना घेण्याचे ठरविले.

त्या प्लॉटची नोटरी करतेवेळी ५० हजार रूपये रोख व २,००,००० रूपयांचा समर्थ बँकेचा चेक दिला असता, तो चेक न घेता रोख रक्कम स्वरूपात स्वीकारली. त्यानंतर व्यवहाराच्या ठरलेल्या रकमेप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली. त्याप्रमाणे राहुल बासुतकर यांनी लेखी स्वरूपात पावत्यासुध्दा दिल्या होत्या. त्यानंतर बरेच दिवसानंतर सौ. माया यांचे पती मनोहर औरंगाबादकर हे त्या ठिकाणी सुधारणा केली आहे किंवा कसे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी गेले.

राहुल बासुतकर यांनी तेथे कोणत्याही प्रकारची सुधारणा केल्याचे दिसून आले नाही, तेव्हा सौ. माया औरंगाबादकर यांच्या पतीने राहुल बासूतकर यांना विचारले असता, ठरल्याप्रमाणे पुर्तता होत नसेल तर आमची संपूर्ण रक्कम आम्हास परत द्या, अशी मागणी केली. त्यावेळी अर्थिक अडचण व ऑफिसच्या दिरंगाईमुळे वेळ लागत आहे, त्यामुळे नंतर देतो, असे आश्वासन दिले. परंतु आजतागायत सदर रक्कम व सदरचा प्लॉट नावावर न करता सौ. माया औरंगाबादकर यांची फसवणूक व विश्वासघात केला. 

त्याचबरोबर टाऊन प्लॅनिग अॅक्टमधील तरतदीचा भंग करून सौ, औरंगाबादकर व इतर लोकांची फसवणूक केलीय. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भादवि ४२० प्रमाणे राहुल बासुतकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पोपळभट या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.