Type Here to Get Search Results !

सोन्या-चांदीच्या दागिन्याबरोबर हरिण-काळविटाचे १० शिंगे जप्त


स्थानिक गुन्हे शाखेने आणले घरफोडीचे ०६ गुन्हे उघड; ०५ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या उल्लेखनिय कामगिरीत २२ गुन्ह्यात पाहिजे आरोपीस गजाआड करण्यात आलंय. ६ गुन्ह्यात निष्पन्न घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून १२२.५ ग्रॅम वजनाचे सोने ३३.५ तोळे चांदीचे दागिण्यांबरोबर  हरीण/काळवीटचे १० शिंगे, ०४ जाळे हस्तगत करण्यात आले. त्याच्या साथीदाराकडून देशी बनावटीचं १ पिस्टल ०२ जिवंत काडतुसं असा  ५, १७, ६५९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचं सोलापूर ग्रामीण पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात, याकरीता जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकाऱ्यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयात सराईत गुन्हेगार व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी मार्गदर्शन केले होते.

मंद्रुप हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पथकातील सहाफौ/ ख्वाजा मुजावर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम आपल्या कब्जात गावठी पिस्टल बाळगुन दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे चौकात येणार असल्याचे समजले होते. त्या ठिकाणी उप-निरीक्षक सुरज निंबाळकर व राजु डांगे यांच्या पथकाने पोहोचून टाकळी चौकात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत पॅन्टीत खवलेले १ देशी बनावटी पिस्टल व २ जिवंत काडतुस त्याचे ताब्यात मिळून आले. त्याचेकडे अधिक तपास करता, देशी बनावटी पिस्टल व २ जिवंत काडतुस अक्कलकोट तालुक्यातील कल्लकर्जाळ येथील दुसऱ्या आरोपीकडून घेतले असल्याचे सांगितले. 

या आरोपीविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याकडील भादवि क 380 457 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक रविराज कांबळे पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्या गुन्ह्यातील कलकर्जाळ येथील दुसरा आरोपीस तेरा मैल चौकात जावुन सापळा अत्यंत शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. 

त्याच्याकडे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आलीय.  अटकेतील आरोपीकडं पोलीस कस्टडी दरम्यान अधिक तपास करता, त्याने त्याच्या साथीदार सोबत मिळून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याकडील ०२ आणि मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील ०४ घरफोड्या केल्याची कबुली दिलीय. 

या ०६ गुन्ह्यातील गेल्या मालापैकी अटक आरोपीकडून १२२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३३.५ तोळे चांदीचे दागिने असा ५, १३, ६५९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपीच्या घरझडती घेतली असता त्याचे घरातून हरीण/काळवीट जंगली प्राण्याचे १० शिंगे व जंगली प्राणी पकडण्याचे ०४ जाळे हस्तगत करण्यात आले आहे. त्याबाबत वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9 प्रमाणे या गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई कांबळे करीत आहेत. हा आरोपी न्यायालयील कोठडीत आहे.

सदर आरोपी याचे सोलापूर ग्रामीण जिल्हयाचे गुन्हेगारी अभीलेख पडताळणी करता कलकर्जाळ ता. अक्कलकोट येथील दुसरे आरोपीवर अक्कलकोट उपविभागात १४ गुन्हयात, सोलापूर उपविभागात ४ गुन्हयात, मंगळवेढा उपविभागत ४ असे एकुण २२ गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर नेतृत्वाखाली तत्कालिन सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उप निरीक्षक सुरज निंबाळकर, पोलीस उप-निरीक्षक रविराज कांबळे, पोसई राजु डांगे यांच्या पथकातील ग्रेडपोसई राजेश गायकवाड, सपोफौ महमद इसाक मुजावर, गायकवाड, पोहेकॉ परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, पोकॉ अन्वर अत्तार पोकॉ समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देवकाते, चापोना समीर शेख, चापोकॉ सतीश कापरे यांनी बजावली.