Type Here to Get Search Results !

... अन्यथा आमच्या घरात यायचे नाही; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल



सोलापूर : लग्नात आमच्या मनाजोगता मानपान झाला नाही, तू आम्हाला पसंत नसताना तुझ्यासोबत लग्न केलंय, तू माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये, अन्यथा घरात यायचे नाही, अशी धमकी सासरच्या मंडळींनी विवाहितेस दिलीय. सौ. प्रियंका प्रभाकर कोळी ( वय-२४ वर्षे) असं या विवाहितेचे नाव आहे. तिने तुम्हारे सहा वर्ष सहन केल्यावर तो असह्य झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतलीय. तिच्या फिर्यादीनुसार सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हल्ली एमआयडीसी परिसरातील नीलम नगर जमादार वस्ती येथे माहेरी वास्तव्यास असलेली सौ.प्रियंका हिच्या सासरची मंडळी वरील नमूद कारणावरून, ती इंडी तालुक्यातील धुळखेड येथे सासरी नांदत असताना वरील नमूद कारणावरून पती प्रभाकर कोळी व घरातील इतर सर्वजण जुलै २०१८ पासून ०१ मार्च २०२४ रोजी दरम्यान तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते.

त्यातच सासरच्या मंडळींनी तिच्या मागे, माहेरून दोन लाख रूपये आण, पैसे नाही आणले तर तू आमचे घरी परत यायचे नाही, असे म्हणून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत तिच्या आई-वडीलांना शिवीगाळ करून शारीरीक व मानसिक छळ व जाचहाट केला. या छळास कंटाळून तिने माहेर जवळ केले. सौ. प्रियांकाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी प्रभाकर कोळी (पती), महादेवी सुभाष कोळी (सासू) आणि सिद्राम कोळी (सर्व रा. मु.पो. धुळखेड) यांच्याविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. पोलीस उपनिरीक्षक बनसुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.