Type Here to Get Search Results !

दोन मुलांसह महिला बेपत्ता

सोलापूर :  होटगी रस्त्यावरील हत्तुरे नगरातील विवाहिता तिच्या घरातून कोणास काही न सांगता २ मुलासह घरातून निघून गेलीय. ही घटना गुरुवारी, २८ मार्च रोजी दुपारी घडलीय. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टरला नोंद झालीय.

बेपत्ता महिला सौ. अंबिका पुंडलिक हत्तुरे (वय-२८वर्षे) ही हत्तुरे वस्तीतून गुरुवारी दुपारी १२.०० वा.चे. सुमारास हि राहते घरांतून रविकांत (वय - ७वर्षे) आणि रतिकांत (वय - ६वर्षे) यांना घेऊन निघून गेली आहे. तिचा नातेवाईकांकडे व सोलापुर शहरात शोध घेतला ती मिळुन आली नाही, म्हणून तिचा भाऊ तिलप्पा अण्णप्पा देसाई यांनी विजापुर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यांने वरीलप्रमाणे बेपत्ता नोद आहे. 

तरी सदर बेपत्ता महिलेचे व मुलाचे वर्णन : सौ. अंबिका पुंडलिक हत्तुरे (वय-२८ वर्षे) उंची-१६५, रंग-गोरा बांधा-मध्यम, भाषा-मराठी, कन्नड, तिचा मुलगा रविकांत (वय-७ वर्ष) रंग-सावळा बांधा-मध्यम उंची ३.५ फुट आणि रतिकांत  (वय-६ वर्ष) रंग-गोरा बांधा-मध्यम उंची ३ फुट असं वर्णन आहे. 

ते कोणास आढळल्यास वा यासंबंधी माहिती मिळाल्यास विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांक-०२१७-२४७७६५१ अथवा  ९९२३२०३४३० या भ्रमणध्वनी क्रमांक आवर संपर्क साधावा असं आवाहन विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केलं आहे.