Type Here to Get Search Results !

०८ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास कामगार मंत्र्याच्या पुतळ्याचे दहन करणार : साथी बशीर अहमद

 

सोलापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांचे नोंदणी, नूतनीकरणचे कामकाज आणि आर्थिक लाभ व गृहउपयोगी वस्तू संच वाटप आचार संहिता असल्याने बंद आहे. ८ दिवसात कामकाज व वाटप सुरु न झाल्यास कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा पुतळा दहन करण्यात येईल, असा इशारा कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिला.

२००२ मधील ग्रामपंचायतच्या आचार संहितेत राज्य निवडणूक आयोगाकडे रीतसर परवानगी घेऊन वाटप सुरु होते, त्याच प्रमाणे यावेळेस देखील लोकसभांच्या निवडणुकीत वाटप सुरु करण्यात यावे या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. 



यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी मुंबई कार्यालयाकडे कळवून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. 

यावेळेस समता मजूर युनियनचे साथी छगन पंढरे, संघर्ष कामगार युनियनचे अंगद जाधव, जनरल कामगार युनियनचे कॉम्रेड एजाज शेख, बाबा बागवान, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, महाराष्ट्र लेबर युनियनचे अशपाक शेख, औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे, शिवाजी कांबळे, महेश गायकवाड, रिपब्लिकन कामगार सेनेचे सागर कोळी, डॉ. आंबेडकर लेबर कंट्रेक्टर असोसिएशनचे सुगतपाल कांबळे, शिवशक्ती भिमशक्ती कामगार संघटनेचे साथी नितीन कांबळे आदि उपस्थित होते.