Type Here to Get Search Results !

शिंदे यांचा सनसनाटी आरोप ... ! स्थानिक १९ इच्छुकांना डावलून दिला जातोय बाहेरील उमेदवार



सोलापूर : भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत होण्यासाठी राम सातपुते यांना उमेदवारी दिलीय. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्थानिक चा आग्रह अन् स्थानिक १९ इच्छुकांना डावलून बाहेरील उमेदवार का दिला जातोय, असा सनसनाटी आरोप १९ इच्छुकांतील दिलीप शिंदे यांनी केलाय.

विरोधी पक्षाचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाने बाहेरील उमेदवार सोलापूरकरांवर लादला आहे, असं सांगत लोकसभा मतदारसंघात रान उठवलं आहे. राम सातपुते यांचं नांव पुढे येण्यापूर्वी माझ्यासह जवळपास १९ स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज केले होते. 

या इच्छुकांना संभ्रमात ठेवण्याबरोबरच चुकीची माहिती देत, स्थानिक इच्छुक नेत्यांना डावलून मूळतः बीडचे तथा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी भाजपने दिलीय. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्थानिक चा उमेदवार असा त्यांच्या भावनांची वा इच्छुक उमेदवारांच्या इच्छेचा आदर उमेदवार घोषित करताना झालेला नाही.

त्यामुळे भाजपमधील मोठा गट नाराज आहे. राम सातपुते यांच्या सभेला देखील उपस्थित राहत नाहीत. राम सातपुते यांच्यामुळे भाजपमध्ये मोठी नाराजी पसरलीय, अशी माहिती दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर रविवारी माध्यमांना दिलीय. 

राम सातपुते हे भाजपाकडून लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत, मात्र भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि षडयंत्र हे सर्व भाजपमधील राष्ट्रीय नेत्यांना माहित झाले तर शेवटच्या क्षणी उमेदवार बदलू शकतो, उमेदवारी दिली म्हणजे एबी फॉर्म दिला, असे नाही. यापूर्वीची अनेक उदाहरणं आहेत, सोलापूरातील भाजपमधील षडयंत्र वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आली तर नक्कीच उमेदवार बदलला जाऊ शकतो, असंही दिलीप शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.