Type Here to Get Search Results !

पोलीस जाणीव सेवा संघाच्या वतीने तहानलेल्या पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय


संजय पवार

बार्शी : पोलीस जाणीव सेवा संघ संचलित, बार्शी शाखेच्या वतीने उन्हाळ्याच्या तीव्र पाणी टंचाईच्या काळात पक्षी आणि प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तडफड होऊ नये, म्हणून शहरात ठिक ठिकाणी छोटेखानी पानवट्याची सोय करण्यात आलीय. पाखरांसाठीच्या या उपक्रमाकडे नागरिक कुतूहलाने पहात आहेत.

शहरातील मोठमोठाली झाडे वस्त्या व झाडांच्या ठिकाणी ही पाणी पिण्याची साधने बसविण्यात आली आहेत. पोलीस जाणीव संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडवणीस (बार्शी तालुका अध्यक्ष समिती) बार्शी शहर उपाध्यक्ष भाग्यश्री भोंडवे यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले.


त्यांच्या या उपक्रमाचे बार्शी शहर आणि तालुक्यात नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, तर साठवलेले पानवट्यावर पक्षीही आनंदाने पाण्यामध्ये डुंबण्याचाही आनंद घेत आहेत. निसर्गप्रेमी असणाऱ्या बार्शीकर यांना यांच्या या उपक्रमाबद्दल फारच कौतुक वाटत आहे. कासारवाडी, उपळाई, गौडगांव, मळेगाव या भागात या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आले आहेत

यावेळी बार्शी तालुकाध्यक्ष सम्मेद तरटे, शहराध्यक्ष कौशल्या राऊत, उपाध्यक्ष भाग्यश्री बोंडवे, बळेवाडी महिला अध्यक्षा वर्षा तरटे, सदस्य सारिका चव्हाण, कासारवाडी अध्यक्ष आदेश शिंदे, सहकार्याध्यक्ष चंद्रकांत कदम, ऋषिकेश देवधरे, योगेश पाचकूडवे, रविराज तुंगतकर, गणेश शिरतोडे,अक्षय गायकवाड, तुषार भिसे आणि ऋषिकेश रणदिवे उपस्थित होते.