नवीन टाकळी : नवीन टाकळी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नवीन टाकळी येथील भिमगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने तिन्ही बहुजन महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्रिशरण पंचशीलाचे सामूहिक वंदना घेउन तिन्ही महामानवांना अभिवादन करण्यात आले.
मध्यरात्री १२ वाजता सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात एकत्र येऊन आतिषबाजीच्या रोषणाईत, महामानवांच्या जयघोषात व गोड मिठाई वाटून एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आले. यावेळी सोलापुर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हा प्रमुख धर्मराज बगले, सिद्धाराम मधुरे मालक यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी भिमगर्जना प्रतिष्ठानचे प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी, उत्सव अध्यक्ष रेवप्पा साबळे, उपाध्यक्ष पप्पु काटे, कोषाध्यक्ष राजकुमार गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजशेखर गायगवळी, एल. आय. सी. चे मुख्य सल्लागार रेवणसिद्ध कनशेट्टी साहेब, शिवसेना कार्यालयीन प्रमुख अली पिरजादे, बोलूशा साबळे, गजानंद कट्टीमनी, प्रकाश साबळे, रेवणसिद्ध व्हनराय, अक्षय साबळे, अविनाश शिवशरण, नागेश गायकवाड, चंद्रकांत साबळे, गणेश बाणीकोल, बसवराज गायकवाड, रूपसेन उमरगे, प्रकाश उमरगे, लालु बोरगी, भिमाशंकर बटगी, समीर बोरगी, सतिष कांबळे, सोनु भोई, उदाराम भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.